20180621There has been speculation about whether बालकवि's औदुंबर was meant to be a longer poem that he never managed to complete. The speculation ended recently when the additional lines were discovered in his archives.औदुंबर - बालकवि ठोंबरेऎल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊननिळासांवळा झरा वाहतो बेटाबेटातुन.चार घरांचे गांव चिमुकले पैल टेकडीकडेशेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढे.पायवाट पांढरी तयांतुनि अडवीतिडवी पडेहिरव्या कुरणामधुनि चालली काळ्या डोहाकडे.झांकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवरपाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर.वर्षांपासुन – शतकांपासुन! - त्याचें ठाणे इथेंकुणास ठाउक विचार कसले त्याच्या डोक्यामधेगावामधल्या सुखदुःखाचें असते त्याला भान?कोण संपला कोण राहिला नोंदे का तें ज्ञान?शेतामधुनी पीक काढण्या प्रयत्न जितका होतोत्या श्रेयाच्या फलप्राप्तीची पर्वा करतो का तो?तटावरीच्या हरिण-सशांना मिळतें का तें पीक?पिकावाचुनी पुरतो चारा सकलांना का ठीक?वृक्षाच्या अंतरी पहावे आपण त्याचे मनमला वाटतें औदुंबर करि विश्वाचें चिंतन !
Saturday, June 22, 2019
औदुंबर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment